राज्यातील विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधरच्या नाशिकसह पाच जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यावेळी नाशिक पदवीधरच्या मविआच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना, 'मी माझ्या भावांना आणि बहिणींना आव्हान करते की मी माझ्या शब्दावर पक्की आहे येणाऱ्या २ फेब्रुवारीला विजय झाल्याबरोबर आंदोलन करणार आहे. फक्त आज धनशक्ती विरोधात जनशक्तीचा विजय झाला पाहिजे' अशी प्रतिक्रिया दिली.