नाशिक पदवीधर जागेसाठी मतदानाला सुरूवात झाली असून अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या कुटुंबाने मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी डॉ. सुधीर तांबे, आई दुर्गा तांबे, आणि पत्नी मैथिली तांबे यांनी मतदानाचा हक्क बजावला. मी गेली अनेक वर्षे उत्तर महाराष्ट्रात सतत काम करत आहे, याचा चांगला प्रतिसाद सत्यजितला मिळत आहे, अशी प्रतिक्रिया सुधीर तांबेंनी दिली.