MLC Elections Results: 'मला आत्मविश्वास होता की...'; कोकण मतदारसंघातून ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी
'हा विजय माझ्या एकट्याचा नसून सर्व शिक्षकांचा आहे. मला पूर्ण आत्मविश्वास होता की, शिक्षकांचा आमदार हा शिक्षक होणार आहे. मला सर्व संघटना आणि पक्षांचा चांगला पाठिंबा असल्याने विजय झाला आहे. शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवणार' अशी प्रतिक्रिया भाजपाचे विजयी उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिली