हिंमत असेल तर स्वत:चं काही निर्माण करा, स्वत:च्या मुलांना जन्म द्या- संजय राऊत
मुंबई पालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालयावर शिंदे गटाने ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या सर्वच गोष्टीवर आमचा अधिकार आहे, असा दावा शिंदे गटातील नेते करत आहेत. याच मुद्द्याला घेऊन ठाकरे गटातील नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. "हिंमत असेल तर स्वत:चं काही निर्माण करा. नाव शिवसेना, नेते बाळासाहेब ठाकरे आणि पक्षाची कार्यालये आमची. मग तुम्ही काय केलं? स्वत:च्या मुलांना जन्म द्या," असे संजय राऊत म्हणाले.
#eknathshinde #sanjayraut #devendrafadnavis #shivsena #shivsenabhavan #balasahebanchishivsena