राज्यपाल आणि भाजप आमदार यांनी केलेल्या शिवरायांबद्दलच्या वक्तव्याबद्दल बोलत असताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, 'राज्यपालांनी शिवरायांचा अपमान केला त्यावर राज्यसरकार काही बोलले नाही' त्याचसोबत 'तुमचे राष्ट्रीय प्रवक्ते शिवरायांबद्दल बोलतात, प्रसाद लाड शिवरायांबद्दल बोलतात तेव्हा तुम्ही का बोलत नाही?' असा सवालही त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे आणि शंभुराज देसाई यांना केला.