शिवसेना महिला आघाडीच्या वतीने प्रतिकात्मक संजय राऊत यांना ठाण्यातील मनोरुग्णालयात भरती करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी रुग्णालयात रुग्णवाहिका नेण्यास मनाई केली. शिवसेना महिला आघाडीच्या वतीने यावेळी रुग्णालयात संजय राऊत यांचे दाखल पत्र रुग्णालयातील अधीक्षकांना देण्यात आले, तसेच संजय राऊत यांच्या करिता या रुग्णालयात बेड ही बुक करण्यात आला. यावेळी शिवसेना महिला आघाडी प्रमुख मिनाक्षी शिंदे माजी नगरसेविका नम्रता भोसले,मालती पाटील, यांच्या सह सर्व पदाधिकारी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात उपस्थित होत्या.