राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आणि शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी राहुल कलाटे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी राहुल कलाटे यांची भेट घेतली. यावेळी राहुल कलाटे यांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं, त्यांनी घोषणाबाजी केली. राहुल कलाटे यांनी बंडखोरी न करता महाविकास आघाडीसोबत राहतील त्याचा विचार राहुल कलाटे हे करतील अशी अशा व्यक्त आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केली आहे.