'मुलं-मुलांसोबत आणि मुली-मुलींसोबत लग्न करत आहे, ही कुठली परंपरा आपल्या संस्कृतीमध्ये आलेली आहे?' असं वक्तव्य अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केले. 'आई वडील मुला-मुलींना शिक्षणासाठी पाठवतात मात्र ते भाड्याच्या घरात लिव्ह-इनमध्ये राहतात.आई वडील कर्तव्य पार पाडतात त्यामुळे मुलांनी आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. समाजाने आपल्याला खुप काही दिलेले आहे' असा सल्लाही नवनीत राणा यांनी दिला.