राज्यातील राजकीय तणाव लक्षात घेऊन शिवसेनेच्या शिंदे गट आणि समर्थक अपक्ष आमदार यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली. सत्ता स्थापनेनंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपुरात दाखल होताच चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून ही सुरक्षा काढून घेण्याची मागणी केली आहे.