राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच कोकणातील तौते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागाचा दौरा केला. या दौऱ्यावरून राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. तसेच, अतुल भातखळकरांची टीका, संभाजीराजे भोसलेंची मराठा आरक्षणावरून आगपाखड या मुद्द्यांवर देखील त्यांनी भूमिका स्पष्ट केली.