Samarjeetsinh Ghatge vs Hasan Mushrif: कोल्हापुरात घाटगे विरुद्ध मुश्रीफ राजकारण पेटले
'हसन मुश्रीफ साहेब तुमचे काळीज वाघाचे असेल, तुमच्यात पुरुषार्थ असेल तर आता जातीच्या मागे का लपता? जर काही केलं नसेल तर भीती कशाला वाटते? जातीच्या मागे लपून राजकारण करतो तो माणूस जातीयवादी असतो हे मुश्रीफ यांनी स्वतः सिद्ध केलं' अशी टीका भाजपा शहराध्यक्ष समरजीत घाटगे यांनी केली त्यावर 'जमिनीच्या तुकड्या पुरतेच तुम्ही वारसदार आहात' असा घणाघात हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्याने समरजित घाटगेंच्या आरोपानंतर केला. 'कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन घाटगे यांनी बालिश वक्तव्य केली. हसन मुश्रीफ हेच शाहूंच्या विचारांचे वारसदार आहेत' असे विधान करत जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने यांने घाटगे यांच्यावर हल्लाबोल केला