करोना महामारी आल्यापासून राज ठाकरे मास्क लावत नव्हते. अशातच मागील काही काळापासून पायाच्या आजाराने त्रस्त असणारे राज शस्त्रक्रियेसाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते. परंतु ते पुन्हा एकदा करोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्यांच्यावरील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. याच मुद्द्यावरून अजित पवारांनी राज ठाकरेंना टोला लगावला.