पायाच्या आजाराने त्रस्त असणारे राज शस्त्रक्रियेसाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते. परंतु ते पुन्हा एकदा करोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्यांच्यावरील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. यावरून अजित पवारांनी राज ठाकरेंना टोला लगावला होता. त्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पवारांना प्रत्युत्तर दिलंय.