गेल्या काही वर्षांत राजकीय नेत्यांकडून, कार्यकर्त्यांकडून पोलिसांना दमदाटी करण्याचे, त्यांना बदली करण्याची भीती दाखवण्याचे प्रमाण वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी सर्वांनाच खडे बोल सुनावले आहेत. केसेस आणि बदली कामापुरते पोलीस ठाण्यात न येता पोलिसांना पाठबळ देण्यासाठीही या अशा शब्दात त्यांनी राजकीय नेत्यांना कानपिचक्या दिल्या. सांगली जिल्ह्यातील विश्रामबाग येथे नतून पोलीस मुख्यालयाच्या इमारतीच्या भूमिपूजनाच्या वेळी ते बोलत होते.