सांगली जिल्ह्यातील विटा येथील एका कार्यक्रमात भाजपचे खासदार संजय पाटील यांनी ईडीबाबत टिप्पणी केली आहे. 'माझ्यामागे ईडी लागणार नाही कारण मी भाजपचा खासदार आहे. आणि त्या पेक्षा आमची कर्ज पाहिली की ई डी म्हणेल ही माणसं आहेत की काय,' अशी मिश्किल टिपणी संजय पाटील यांनी केली आहे. स्थानिक नेत्यांनी कर्ज आणि संपत्ती वरून केलेल्या भाष्यवरून ते बोलत होते.