'करोनानंतरही बेरोजगारीच्या प्रश्नावर सरकार गंभीर दिसत नाहीये. जीडीपी ६.८ % दाखवण्यात आला आहे तर मागच्या बजेट मध्ये ८ दाखवला होता. मागच्या वेळच्या ८०० योजनांचे फलित काय याचं उत्तर मिळालं असतं तर बरं झालं असतं. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ७ लाखांच्या पगारापर्यंत टॅक्स स्लॅब नेला मात्र रुपयाचं अवमूल्यन झाल्याने तो ८ लाखांपर्यंत नेला पाहिजे होते. अशी टीका राष्ट्रवादी आमदार जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पावर केली. त्याचसोबत 'कर्नाटकातील निवडणुका पाहून त्या राज्याला खुश करण्याचा प्रयत्न आहे पण इतर राज्यांचे काय?' असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.