भोपाळच्या अयोध्या नगरमध्ये रहाणाऱ्या १२ वर्षीय दिव्यांशी राठौर या विद्यार्थीनीने पाळीव उंदराचा मृत्यू झाल्याने ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. दिव्यांशी अयोद्धा नगरमधील सेंट पॉल शाळेची विद्यार्थीनी असून ती इयत्ता सातवीत शिकत होती.चार ते पाच दिवसांआधी मृत मुलीचे वडील एका उंदराला घरी घेऊन आले होते. फारच कमी दिवसांत दिव्यांशीची त्या उंदरासोबत गट्टी जमली. शनिवारी सकाळी त्या उंदराचा अचानक मृत्यू झाला. त्यामुळे ती दुःखी झाली. तिने त्या उंदराला घराच्या अंगणात दफन केले आणि श्रध्दांजली वाहली. त्यानंतर ती आपल्या रूममध्ये निघून गेली, बराच वेळ झाला ती बाहेर आली नाही म्हणून तिच्या आईने दरवाजा ठोठावला तरीही तिने उत्तर दिले नाही. तिच्या आईने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला आणि त्यावेळी दिव्यांशी गळफास घेतल्याच्या स्थितीत दिसली. त्यानंतर तिला तत्काळ रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. परंतु, उपाचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews