काही दिवसांपूर्वी तुरुंगात अलार्म वाजूनही जिमनेज अंथरुणातून उठला नाही. यामुळे तुरुंगातील कर्मचाऱ्यांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. पण त्याने कसलाही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर ताबडतोब डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. त्यांनी जिमनेजचे झोपेतच निधन झाल्याचे सांगितले. जिमनेजचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाल्याने त्याचे तात्काळ पोस्टमार्टम करण्यासाठी डॉक्टरांची एक टीम रुग्णालयात सज्ज ठेवण्यात आली होती.मृतदेह रुग्णालयात पोहचताच पोस्टमार्टम रुममध्ये नेण्यात आला. पोस्टमार्टमसाठी त्याच्या शरीरावर मार्किंगही करण्यात आली. डॉक्टर ब्लेडने जिमनेजचे पोट उघडणार तेवढ्यात तो घोरू लागला. मृत व्यक्ती कशी काय घोरू शकते असा सर्वांनाच प्रश्न पडला. त्यानंतर डॉक्टरांनी मृतदेहाची पुर्नतपासणी केली असता त्याचा श्वास सुरू झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. थोड्या वेळानंतर जिमनेजला शुध्द आली. स्वत:ला डॉक्टरांच्या गराड्यात बघून आश्चर्यचकीत झालेल्या जिमनेजने मी इथे कसा आलो असे विचारताच संपूर्ण खोलीत एकच हास्यकल्लोळ उडाला.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews