ट्रम्प यांचे पूत्र आणि व्हेनेसा यांचे पती डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर यांच्या मॅनहटन येथील घरच्या पत्त्यावर एक लिफाफा पाठवण्यात आला होता. लिफाफा उघडल्या नंतर त्यात पांढऱ्या रंगाची पावडर आढळून आली. लिफाफा उघडल्यानंतर व्हेनेसा यांना उलटी आल्यासारखे झाले. तसेच श्वास घेण्यासही त्रास जाणवला.घातपात करण्याच्या हेतूने हा लिफाफा पाठवण्यात आला असावा असा अंदाज सुरक्षा यंत्रणांनी वर्तवला. त्यानंतर व्हेनेसा यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासणीनंतर या पावडमुळे त्यांच्या आरोग्यास कोणताही धोका नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. भीतीदायक घटनेनंतर व्हेनेसा आणि मुले सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. व्हेनेसा ट्रम्प यांनी देखील घटनेनंतर तत्परता दाखवणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेचे आभार मानले आहेत.डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर यांच्या घरी पाठवलेल्या संशयास्पद लिफाफ्यातील पावडरचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews