लिहिताना विरामचिन्ह टाकायला विसरल्याने ऑखर्ट डेअरी या अमेरिकन कंपनीला चक्क ५ मिलियन डॉलर इतकी मोठी रक्कम कामगारांना दंडापोटी द्यावी लागणार आहे. अर्थात, कंपनीनेही ही रक्मक देण्याची तयारी दर्शवली आहे.अल्पविराम नसल्यामुळे कंपनीच्या संदेशात अनिश्चितता निर्माण होत आहे.कंपनीचे वाहन चालक आणि कंपनी यांच्यात एका ओव्हर टाईमच्या रकमेवरून न्यायालयात वाद सुरू होता. तीन वाहन चालकांनी कंपनी विरोधात न्यायालयात धाव घेतली होती.एक अल्पविराम नसल्यामुळे चालकांना कंपनीच्या संदेशाचा अर्थ समजून घेणे कठीण झाले. न्यायालयाने या प्रकरणात कंपनीविरोधात चालकाच्या बाजूने निर्णय दिला. तसेच, संदेशामध्ये कोणत्या ठिकाणी अल्पविराम देण्याची आवश्यकता होती हेही कंपनीला सांगितले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews