अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत भोंदू बाबांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत दिल्लीच्या विरेन्द्र दीक्षित कालनेमी, बस्तीचे सचिदानंद सरस्वती आणि इलाहाबादच्या त्रिकाल भवंता यांची नावे आहेत. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला सर्वच १३ आखाड्यांचे प्रमुख सहभागी झाले होते.‘आम्ही जनतेला आवाहन करतो की, अशा बाबांपासून सतर्क रहा जे कोणत्याही परंपरा किंवा संप्रदायातून नाहीयेत. साधू, संत, सन्यासी परंपरा, उदासीन परंपरा, नाथ परंपरा, वैष्णव संप्रदाय, शिव संप्रदायातून येतात. तेच भोंदू बाबा कोणत्याही परंपरा किंवा संप्रदायातून येत नाहीत’.याआधीही १० सप्टेंबरला अखिल भारतीय आखाडा परिषदेने भोंदू बाबांची पहिली यादी जाहीर केली होती. यात आसाराम बापू, गुरमीत राम रहीम, सुखविंदर कौर ऊर्फ राधे मां, सच्चिदानंद गीरी, ओमबाबा ऊर्फ विवेकानंद झा, निर्मल बाबा, इच्छाधारी भीमानंद ऊर्फ शिवमूर्ती द्विवेदी, स्वामी असीमानंद, ओम नम: शिवाय बाबा, नारायण साई, रामपाल, कुश मुनि, मलखान गिरी आणि बृहस्पती गीरी यांचा समावेश होता.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews