काही दिवसांपूर्वी पाकिस्तान ची सेना आणि बॉर्डर अॅक्शन टीमने कृष्णा घाटीमध्ये भारतीय जवानांच्या मृतदेहा ची विटंबना केली होती. नवीन वर्ष सुरु होण्याआधी पुन्हा जवानांवर हल्ला झाला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेनंतर संरक्षण मंत्री यांनी जवानांना पाकिस्तानला चोख उत्तर देण्यासाठी परवानगी दिली आहे. सरकारने म्हटलं की जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही.पाकिस्तान चोख उत्तर द्या.आणि गरज असेल तिथे घरात घुसून मारा. पुंछमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत हे काश्मीरमध्येच आहेच. जनरल रावत एलओसीवर सुरु असलेल्या ऑपरेशनल स्थितीचा आढावा घेण्यासाठी तेथे आहेत. सध्या ते परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews