शिखर धवन याच्या बायकोला व मुलांना दुबई विमानतळावरून दक्षिण आफ्रिकेच्या विमानात चढू दिले नाही. एमिरेट्स एअरलाईन्सने शिखर धवनला मुलांच्या जन्माचा दाखला दाखविल्या नंतरच प्रवास करू देणार असल्याचे सांगितले आहे. एअर लाईन्सच्या या गैर व्यवहारामुळे धवन संतापला असून त्याने ट्विटरवरून त्याचा राग व्यक्त केला आहे.गुरुवारी टीम इंडियाचे सर्व खेळाडू दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. त्यांची मुंबईहून दुबई व दुबईहून दक्षिण आफ्रिका अशी कनेक्टिंग फ्लाईट होती. शिखर धवनसोबत त्याची पत्नी व तीन मुलं देखील दक्षिण आफ्रिकेला जाणार होते. पण दुबई विमानतळा वरून दक्षिण आफ्रिकेचे विमानात चढण्याआधीच विमानतळ अधिकाऱ्यांनी शिखर धवनला मुलांचे जन्माचे दाखले दाखवायला सांगितले. पण धवनकडे ते नसल्याने त्याच्या मुलांना विमानात प्रवेश करू दिला नाही. ज्यावेळी जन्माचे दाखले आणणार त्यावेळीच प्रवास करायचा असे धवनला सांगण्यात आले. त्यामुळे शिखर धवनला पत्नीला व मुलांना विमानतळावरच सोडून दक्षिण आफ्रिकेला रवाना व्हावे लागले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews