सरकारने नागरिकांना आनंदाची बातमी दिली असून थोडं टेन्शन कमी केलं आहे. आता पॅन आधार नंबरशी लिंक करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. ही सीमा शुक्रवारी पुढील तीन महिन्यासाठी म्हणजे 31 मार्च 2018 पर्यंत वाढवण्यात येत आहे. ही वेळ आतापर्यंत तिसऱ्यांदा वाढवण्यात आली आहे.
केंद्र सरकारने उच्च न्यायालयाला सांगितले आहे की, वेगवेगळ्या सेवांमध्ये आणि कल्याणकारी योजनांशी आधार जोडण्या साठी 31 मार्च पर्यंत वेळ आहे. वित्त मंत्रालयाने सांगितले आहे की, आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार अजून अनेक करदात्यांनी पॅन आधार नंबरशी लिंक केलेले नाही. त्यामुळे ही मुदत वाढवून
31 मार्च 2018 पर्यंत वाढवण्यात आली आहे. या नोव्हेंबरपर्यंत 33 कोटी पॅन धारकांपैकी 13.28 कोटी लोकांनी आपले पॅन 12 अंकी डिजिटल आधार नंबरशी जोडले आहे. यंदा आयकरने पॅन नंबरसोबतच आधार देखील अनिवार्य केलं आहे.
सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डची सक्ती करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावनी गुरूवारी झाली. या वेळी माहिती देताना सरकारने ही माहिती दिली. आधारच्या सक्तीला विरोध करणाऱ्या याचिकेवर निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कायदेशीर समिती नेमण्याचा मुद्दाही उपस्थित केला.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews