भारतात आता वंदे मातरम् बोलल्यावर शिक्षकच करू लागलेत शिक्षा | Latest Marathi News | Lokmat News

Lokmat 2021-09-13

Views 1

शाळा हे विद्येचे मंदिर आहे. तिथे अनेक चांगल्या गोष्टी शिकवल्या जातात. देशभक्ती जागृत केली जाते. राष्ट्रगीत, वंदे मातरम् हा तर दैनंदिन जीवनाचा भाग होऊन जातो. पण अशी ही एक शाळा आहे जिथे वंदे मातरम् आणि भारतमाता की जय बोलल्यावर विद्यार्थ्यांना मारले जाते.ही धक्कादायक घटना कोणत्या इतर देशात नाही तर चक्क भारतात घडली आहे. उत्तर प्रदेशातील मिर्जापूर येथे हा प्रकार घडला. जाफरखानी प्राथमिक विद्यालय असे या शाळेचे नाव आहे. या घटनेची तक्रार अधिकाऱ्यांना करण्यात आली. मुलांनी तक्रार केली आहे की, वंदे मातरम् आणि भारतमाता की जय बोलल्यावर शिक्षक मारतात. दोन विद्यार्थ्यांचे डोके एकमेकांना आपटतात. या प्रकरणी शिक्षक शाहिद फैजल यांना निलंबित केले आहे. त्याचबरोबर उपजिल्हाधिकारी डॉ. अविनाश त्रिपाठी यांनी शाळेला भेट दिली आणि शिक्षक व विद्यार्थ्यांनी संवाद साधला.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS