सातव्या वेतन आयोगासाठी केलेल्या शिफारसीनुसार केंद्र सरकार सातवा वेतन आयोग लागू करण्याचे प्रयत्न करत आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काही दिवसापूर्वी पगारवाढ करण्याचं आश्वासन दिलं होतं. जर आता पगारवाढीची घोषना झाली तर कर्मचाऱ्यांचा कमीत कमी पगार २४००० रुपये होणार आहे.वाढलेला पगार एप्रिल महिन्यापासून येणार अशी शक्यता आहे. केंद्रीय कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू झाल्यास त्यांचा पगार कमीत कमी ७ हजार रूपये महिन्यांवरून १८ हजार रूपये महिना होणार आहे. तेच फिटमेंट फॅक्टर सुद्धा २.५७ टक्क्यांनी वाढेल. त्यासोबत जास्तीत जास्त पगार ९० हजार रूपयांहून वाढून २.५ लाख रूपये महिना होईल. सातव्या वेतन आयोगांच्या सिफारशींना कॅबिनेटने २९ जून २०१६ मध्येच मान्यता दिली होती.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews