भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रातील एअरलाइन्समध्ये एअर-फ्लाइट कनेक्टिव्हिटी ला परवानगी देण्यासाठी ट्रायने शुक्रवारी शिफारस केली आहे.विमानात तीन हजार मीटरपर्यंत मोबाईल सेवा मिळू शकत होती. पण, विमान टेक ऑफ घेतल्या नंतर अवघ्या काही मिनिटांतच तीन हजार मीटरपर्यंत उंची गाठत असल्यामुळे सेवा बंद होत होती.ट्रायने ही सेवा पुरवण्यासाठी फ्लाइट कनेक्टिव्हिटी सेवा स्थापन करण्याची मागणी केली. त्याचबरोबर भारतातील इन-फ्लाइट कनेक्टिव्हिटी च्या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन सेवा पुरवणाऱ्या कंपनीला एक वर्षासाठी एकच परवाना फी आकारण्यात यावी, तसेच गरज भासल्यास त्यात बदल देखील करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews