एटीएम कार्ड हरवल्यानंतर बँकेतून नवं कार्ड मिळविण्या साठी १० ते १५ दिवसांचा कालावधी लागतो. जोपर्यंत तुम्हाला एटीएम कार्ड मिळत नाही तोपर्यंत तुम्ही एटीएम मधून पैसे काढू शकत नाही. मात्र, आता येस बँक ने एक करार केला आहे. या करारानुसार नियरबाय टेक बँकेला आधार आधारित असं एटीएम कार्ड उपलब्ध करुन देणार आहे ज्यासाठी पिन नंबरची आवश्यकता लागणार नाही.पेनियर मोबाईल अॅप्लिकेशन चा वापर स्मार्टफोनवर करता येणार आहे. यामध्ये कुठलाही रिटेलर ग्राहकां साठी आधार एटीएम-आधार बँकेच्या रुपात काम करेल आणि रोकड जमा करण्याची किंवा देण्याची सुविधा देऊ शकेल. येस बँक आणि नियरबायने ही सुविधा सुरु करण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियासोबत काम केलं आहे.आधार नंबर आणि बोटांच्या ठशांचा वापर करुन ग्राहक रोकड काढू शकतील.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews