सिंगापूर सरकार देशातील वयाची २१ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाला १४ हजार रुपये देणार आहे. आणि त्या मागील कारण म्हणजे देशाचा नफ्यातील अर्थसंकल्प! आणि हा नफा चक्क ४८ हजार कोटींचा आहे.सिंगापूरचा यंदाचा अर्थ संकल्प जाहीर करण्यात आला. या अर्थसंकल्पात सर्व खर्च वजा जाता १० बिलीयन सिंगापुरी डॉलर (१००० कोटी रुपये) नफा झाल्याची माहिती देशाचे अर्थमंत्री हिंगस्वी केट् यांनी दिली. म्हणून सरकार सर्व नागरिकांना ‘एसजी बोनस’ देणार आहे. कमाईच्या आधारावर सिंगापूरच्या नागरिकांना १०० ते ३०० सिंगापुरी डॉलर (एक सिंगापुरी डॉलर=अंदाजे ५० रुपये) सरकारकडून देण्यात येतील.या रकमेला आण्ही हँग्बाओ यांचे नाव दिले आहे. विशेषप्रसंगी देण्यात येणारी आर्थिक रक्कम असा हँग्बाओ या मेण्डेरीयन भाषेतील शब्दाचा अर्थ होतो.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews