मुंबई मध्ये आता फक्त 1 लाखच फेरीवाले व्यवसाय करू शकतील. उर्वरित सगळ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येईल. बीएमसी च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हि माहिती दिली आहे. सध्या स्थितीतल्या नियमांनुसार मुंबई शहर आणि उपनगरांच्या लोकसंखेच्या अडीच टक्के फेरीवाल्यांना विक्री करण्याचा परवाना दिला जावू शकतो. ज्यानुसार मुंबईत अडीच ते तीन लाख फेरीवाले व्यवसाय करू शकतात. परंतु जागेच्या कमतरतेमुळे हि शक्यता कमी आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार फेरीवाल्यांबद्दल कुठलाही निर्णय टावून वेंडिंग कमिटीच घेईल. मुंबई ची लोकसंख्या आणि विशाल क्षेत्रफळ पाहता 1 ऐवजी प्रत्येक विभागासाठी एक म्हणजे एकूण 7 टावून वेंडिंग कमिटी बनवण्यात येईल. ह्या संदर्भात प्रस्ताव तयार करून बीएमसी कमिशनर कडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews