इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या शाखा आता देशभरात सुरू झाल्या असून, त्यात पोस्टमनमार्फत घरपोच पैसे काढण्याची सुविधा मिळणार आहे. या बँकेमार्फत ‘आधार रिलेबल पेमेंट सुविधा’ सुरू करण्यात येणार असून, त्यात सरकारच्या विविध योजनांचे पैसेही मिळणार आहेत. ग्रामीण भागात याचा मोठा फायदा होणार आहे. यात नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार असल्याची माहिती मुख्य पोस्टमास्तर जनरल एच. सी. अग्रवाल यांनी दिली. 31 मार्चपर्यंत राज्यात 42 बँका सुरू होणार असून, त्यात ही सुविधा आहे.
येथे महाराष्ट्र व गोव्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या ट्रेनिंग सेंटरच्या उद्घाटन सोहळ्यानंतर बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews