शास्त्रज्ञांनी आता थ्री डी तंत्रज्ञानाची पुढील पायरी गाठली असून, अशा दृश्यांमध्ये पडद्यावर दिसणाऱ्या एखाद्या वस्तूला स्पर्श केल्याचा अनुभवही घेता येणार आहे. शास्त्रज्ञांनी यासाठी 'फोर-डी' गॉगल विकसित केला आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठातील मेंदू शास्त्रज्ञांनी हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. एखादे दृश्य आणि त्यामध्ये फिरत असणाऱ्या वस्तूविषयीचा स्पर्श यांचे संकेत देणारा मेंदूतील विशिष्ट भाग शास्त्रज्ञांनी शोधून काढला. त्यानंतर दृश्याची आणि स्पर्शाची या भागामध्ये होणारी प्रक्रिया समजावून घेत, हे तंत्रज्ञान विकसित केले. चित्रपट, संगीत, गेम किंवा अशा पद्धतीच्या रिअॅलिटी मनोरंजनामध्ये हे तंत्रज्ञान वापरता येणार आहे. यामध्ये एखादी वस्तू अचानक चेहऱ्यासमोर येईल आणि त्यामुळे होणारे बदलही अनुभवता येतील.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews