पहिली एसी लोकल 1 जानेवारी 2018 पासून सुरू होणार आहे. मात्र पहिली एसी ट्रेन कशी असेल याची उत्सुकता मुंबईकरांना आहे. मात्र केवळ वातानुकुलीत प्रवास हे या लोकलचे वैशिष्टय़ नसेल. तर मुंबईची पहिली एसी लोकल ‘आमची मुंबई’ या थीमनुसार रंगवली जाणार आहे. या लोकलवर जाहिरातींऐवजी मुंबईच्या मानबिंदूंचे चित्र असेल. यात ऐतिहासिक ठिकाण, पर्यटन स्थळे आणि इतर आकर्षकपणे रंगवली जाणार आहेत. एशियन पेंट्स कंपनीतर्फे सीएसआर प्रकल्पातून हे साध्य होणार आहे. एशियन पेंट्स आणि स्ट्रीट आर्ट इंडिया यांच्या समन्वयाने हा प्रकल्प मार्गी लागेल. सुरुवातीच्या काळात एसी लोकलच्या सात फे-या दिवसभरातून होतील. याचे भाडे साधारणत: फस्ट क्लासच्या तिकीट दरांएवढे असेल. मात्र एसी लोकलचे पास हा सध्याच्या फर्स्ट क्लास पासच्या दीडपट असण्याची शक्यता आहे. एसी लोकलची दारे स्वयंचलित असतील. त्याचे नियंत्रण मोटरमनकडे असेल. प्रत्येक स्टेशनवर एसी लोकल 20 ते 30 सेकंद थांबेल. एसी लोकलचा सर्वाधिक वेग 110 किमी प्रती तास असेल. 2012-13 च्या बजेटमध्ये पहिल्यांदा मुंबईत एसी लोकल धावण्याचे नमूद केले गेले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews