पुण्यातील बांधकाम उद्योजक डी. एस. कुलकर्णी यांनी आज राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि अजित पवार यांची भेट घेतली.
डीएसके सध्या गुंतवणुक दारांचे पैसै थकल्यानं अडचणीत आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना निर्वाणीचा इशारा देत गुंतवणुकदारांचे पैसे परत करण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचं बोललं जात आहे. मात्र, या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप समजू शकलेलं नाही. दरम्यान, कालच्या सुनावणीत हायकोर्टाने त्यांना चांगलंच खडसावलं आहे. 'रिकाम्या हातानं येऊ नका, पैसे उसने घ्या, भीक मागा, काहीही करा, लोकांचे पैसे कधी परत करणार याची माहिती द्या, असे मुंबई हायकोर्टाने डी. एस. कुलकर्णी यांना काल बजावलं होतं.'तसेच, 13 फेब्रुवारीला होणाऱ्या सुनावणीत डीएसकेंना पत्नी हेमांगीसह हायकोर्टात हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews