भारतीय लष्कराला गॅरिसन बनवण्यासाठी बोमाजामध्ये मोठ्या प्रमाणात जमिनीचं अधिग्रहण करण्यात आलं. त्याच्या मोबदल्यात मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी मुक्तो या आपल्या मतदार संघातील लोऊमधील आयोजित कार्यक्रमात ३१ जणांना जमिनीच्या मोबदल्याचं वाटप केलं. तब्बल २००.०५६ एकर जमिनीसाठी सरकारने तब्बल ४० कोटी ८० लाख ३८ हजार चारशे रुपयांच्या चेकचं वाटप केलं.यातील सर्वाधिक रकमेचा धनादेश ६ कोटी ७३ लाख २८ हजार ९२५ रुपयांचा होता. तर त्या खालोखाल दोन कोटी ४४ लाख ९४ हजार ८८६ रुपयाचा चेक संबंधित जमीन मालकाकडे सुपूर्द करण्यात आला. उर्वरित २९ जणांना प्रत्येकी एक कोटी नऊ लाख तीन हजार ८१३ रुपयाच्या धनादेशाचं वाटप करण्यात आलं.दरम्यान, जमीन अधिग्रहणा च्या मोबदल्याचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. त्याला नुकतीच मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांचे आभार मानले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews