स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी 5-6 मतदार संघात लोकसभेची निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे.. यामध्ये हातकणंगले, कोल्हापूर आणि सांगली नावाचा उल्लेख केला आहे.. यावर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी प्रतिक्रिया दिलीये. रविकांत तुपकर म्हणाले की राजू शेट्टींनी घोषणा केलेल्या घोषणांमध्ये बुलढाणा लोकसभेचे नाव आहे किंवा नाही हे मला माहित नाही, मात्र राजू शेट्टींच्या डोक्यात बुलढाणा नाव असो किंवा नसो पण आमच्या डोक्यात बुलढाणा लोकसभा लढण्याचा विचार आहे.
#RavikantTupkar #RajuShetti #SwabhimaniShetkari #Buldhana #Loksabha #Farmers #Kolhapur #Hatkangale #Sangli #Maharashtra