स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्यासह इतर सहकाऱ्यांवर शनिवार (11 फेब्रुवारी) गुन्हा दाखल करण्यात आला. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) आक्रमक झाली आहे. या प्रश्नावरुन शनिवारी स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी आत्मदहन आंदोलनाचा प्रयत्न केला होता. दरम्यान, बुलढाणा जिल्हा कॉंग्रेस कमिटी आता तुपकरांच्या समर्थनात आंदोलन करत आहेत. रविकांत तुपकर यांच्यासह शेतकार्यांवरील गुन्हे मागे घ्या, अशी मागणी यावेळी जिल्हा कॉंग्रेस कमिटीने केली आहे.
#RavikantTupkar #Buldhana #Farmers #Cotton #SwabhimaniShetkari #Congress #Soyabean #Maharashtra #Farming #Crops #EknathShinde #DevendraFadnavis #Mumbai #AICC