ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. ज्यांची लायकी नव्हती त्यांना आम्ही मोठं केलं. २०१४ ला तिकीट देणारे कोण? पक्षाचा नेता कोणी केलं?, असे प्रश्न यावेळी अरविंद सावंत यांनी उपस्थित केले. तर मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडेच नगरविकास खातं ठेवलंय, असा टोलाही त्यांनी लगावला.