Jayant Patil on Pune Election: 'पुण्यात महाविकास आघाडीचा विजय होणार'; जयंत पाटलांची प्रतिक्रिया
'राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी एकदिलाने निवडणुकीत उतरले आहेत. नुकत्याच झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र आल्याने सहज विजय झाला हे आपण सर्वांनी बघितले आहे. हे चित्र महाराष्ट्रात निर्माण झालेले आहे. त्याची पुनरावृत्ती पुण्यातील कसब्यात आणि चिंचवडमध्ये होणार' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी दिली. चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठीच्या प्रचारासाठी आले असताप्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.