Jayant Patil on Koshyari: 'राज्यपाल रिप्लेस करण्यासाठी नवीन माणूस मिळाला नसेल'; जयंत पाटलांचा टोला
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधान यांना निवेदन देऊन महाराष्ट्रातून जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावर जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'राज्यपाल यापूर्वी आम्हालाच सांगत होते 'मुझे जाने का है' आता लेखी विनंती केली आहे तर केंद्रसरकार लेखी निवेदनातील विनंतीचा विचार करेल' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.