'माझी वसुंधरा अभियान' अंतर्गत मोताळा तालुक्यातील सिंदखेड गावाने अमरावती विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे सिंदखेड ग्रामपंचायतीला तब्बल ५० लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे. या चमकदार कामगिरीमुळे सिंदखेड गावासह मोताळा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. गावाने श्रमदान करून एकीचे बळ काय असते हे यावरून करून दाखविले. त्यातही आता गावाचे युवा सरपंच यांनी थेट जपानचा 'मियावाकी' हा प्रकल्प सुरू केला असून भविष्यात गाव पर्यावरणाच्या दृष्टीने समृद्ध करण्याचा निर्धार केला आहे.
#MiyawakiMethod #MajhiVasundhara #Buldhana #SindkhedRaja #Motala #GramPanchayat #Maharashtra #Farmers #Farming #Japan #Japanese #Method #India