काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो’ यात्रा शनिवारी पहाटे हरिणायातून दिल्लीत दाखल झाली. यावेळी दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अनिल चौधरी यांनी बदरपूर सीमेजवळ ‘भारत जोडो यात्रे'चे स्वागत केले. दिल्लीत दाखल होताच या यात्रेत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी तसेच काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी आपला सहभाग नोंदवला.