चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या आरोपींवर दाखल केलेल्या गुन्ह्यावर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, 'चंद्रकांत पाटील ह्यांच्या चुकीच्या विधानानंतर त्यांच्यावर केलेली शाईफेक चुकीचीच होती. पण सरकारने मोठेपणा दाखवावा आणि गुन्हा मागे घ्यावा. हा आंदोलनाचा एक भाग असतो आणि ते अनेकवेळा अनेक ठिकाणी अनुभवलं गेले आहे. पण, सरकार म्हणून आपण जेंव्हा त्यांच्यावर कलम ३०७ गुन्हा लावता तेव्हा ते महाराष्ट्राला पेटवण्याचे काम ठरू शकते'