काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यातील चांदणी चौकातील ट्रॅफिकमध्ये अडकले होते, त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. मुख्यमंत्री शिंदे साताऱ्याला जात असताना हा प्रकार घडला होता. त्यानंतर आज एकनाथ शिंदे यांनी स्वतः चांदणी चौकाची पाहणी केली. आणि यांनतर झालेल्या अधिकाऱ्यांच्या याबैठकीत चौकातील योजना ब्रिज पाडण्याचे निर्देश दिले आहेत.