चांदणी चौकातला ५० टक्के पूल पडला पण अपेक्षित होतं तेच घडलं. चांदणी चौकातला पूल पाडण्यासाठी दुसऱ्या स्फोटाची गरज नाही.ब्लास्टमास्टर आनंद शर्मा यांनी पूल पाडकामाची माहिती दिली.स्टीलचं प्रमाण जास्त असल्यानं पूल पूर्ण भुईसपाट झालेला दिसला नाही. १ वाजता केलेल्या स्फोटानं पूर्णपणे न पडलेला चांदणी चौकातला पूल पहाटे २.३३ वाजता पूर्ण भुईसपाट झाला. यावेळी जेसीबी आणि पोकलेन मशीनच्या मदतीनं पाडकाम करण्यात आलं. त्यानंतर दीड तासांच्या प्रयत्नानंतर चांदणी चौकातला पूल आता इतिहासजमा झाला.