पुण्यातील वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरलेला चांदणी चौकातील (Chandani Chowk) पूल १८ सप्टेंबरला पाडण्यात येणार आहे. पण, वाहतुकीसाठी मात्र आजपासूनच बंद करण्यात आला आहे. पाडण्याच्या पूर्वतयारीसाठी हा पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. यासाठी काही पर्यायी मार्ग खुले करण्यात आलेत. त्यामुळे पुणेकरांना आता दररोज किमान दीड ते दोन किलोमीटर वळसा घालून प्रवास करावा लागणार आहे.