मशिदीवरील भोंग्यांबाबत मुंब्र्यामध्ये काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले होते. आज या भागातील मौलवींनी पत्रकार परिषद घेत त्यांची भुमिका स्पष्ट केली. "सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा, आम्ही मध्ये येणार नाही. सर्वांनी बंधुभाव, शांतता कायम ठेवावी, शांततेत रहावे ", असे आवाहन मौलवी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्वांना केले.