मिटकरींनी ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत ब्राह्मण समाज आक्रमक झाला आहे. पुण्यात ब्राह्मण महासंघाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर अमोल मिटकरींच्या विधानाचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यामुळे तणाव निर्माण झाला होता.