काँग्रेस पक्षाचे नेते निलंबित खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे देशातील राजकीय वातावरण तापलं आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने राहुल गांधींचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. त्यानंतर पुण्यातील हिंदू महासंघ देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. राहुल गांधी यांच्या विधानामुळे दुसरा गोडसे निर्माण होऊ नये, असा इशाराच थेट हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी दिला आहे.