खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळ हे चोरमंडळ आहे, असं विधान केलं होतं. हा विषय सत्ताधारी पक्षाने विधीमंडळात लावून धरत राऊतांविरोधात हक्कभंग आणण्याची भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूवीर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपण विधीमंडळाचा अपमान केलेला नाही. आपण संसद आणि विधीमंडळाचा नेहमीच आदर केलेला आहे. ज्या विधीमंडळाने मला खासदार बनवलं त्या विधीमंडळाविषयी माझ्या भावना बहुमुल्य आहेत, असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं आहे.